सोशल नेटवर्किंग - एक हवा हवासा अनुभव
'हवास तू, हवास तू,
हवास मज तू ,हवास तू'
जेव्हा facebook विषयी बोलले जाऊ लागले तेव्हा अर्चनाला वाटले होते - काय बाबा ही नवीन भानगड? इथे रोजच्या इमैल्स आटोक्यात येत नाहीत तर अजून कशाला नसता उपद्रव. कितीदा तरी कोणी न कोणीतरी विचारायचे - Are you on facebook? प्रश्नाला मार्गी लावायला अर्चनाचा रामबाण उपाय असायचा - हसून नाही म्हणायचे व अधिक चर्चा नको म्हणून विषय तरी बदलायचे किंवा तिथून काढता पाय घ्यायचा . असे करता करता दोन तीन वर्षं लोटली.
एक दिवस का कुणास ठाऊक अर्चनाला हुक्की आली. Facebook जॉईन तर करूया - बघूया जमतंय का - जमलं नाही किंवा कटकट वाटली तर सोडून जायचा रस्ता आहेच. अर्चनाने Facebook जॉईन केले आणि जणू विश्वाची कवाडेच उघडली. अनेक जुन्या मैत्रिणी, मित्र यांच्याशी पुन्हा गट्टी तर जमलीच पण त्याही पेक्षा जास्त म्हणजे जगातील , विश्वातील अनेक सुंदर आविष्कार विना सायास घरबसल्या घडू लागले. तुम्ही म्हणाल - हं यात काय मोट्ठे ? ते तर u-tube किंवा कुठल्याही सर्च इंजिन मधून सहज उपलब्ध होईल. मान्य! पण एवढा वेळ कोणाला आहे? आपल्याच दोस्तांनी आपल्यासाठी निवडलेले छान छान संदेश , ध्वनिफिती, ध्वनी चित्रे अगदी घरबसल्या पाहायला मिळतात. आपल्या सर्व नातेवाईकांची , स्नेह्यांची खबरबात , कोपरखळ्या , त्यांचे अनुभव , त्यांचे देशातानाचे अनुभव, त्यांचे जीवन ,त्यांनी काढलेले फोटो -अगदी सगळं सगळं क्षणात flash करता व बघता येतं. देणारे मनसोक्त देत असतात - आपलीच झोळी अपुरी पडते.
बहिण -भावाचा जाहीर संवाद , मैत्रिणीनी घातलेली कोडी याबरोबरच विचारांची देवाण घेवाण , संवाद, परिचर्चा, अगदी सगळ्यात सहभागी होता येतं आणि खूपच मजा येते. वर्षानो वर्ष मनात असून सुद्धा भेटता येत नाही, बोलायला वेळ नाही , ही खंत पार नाहीशी होते.आले काही तरी मनात -घाला status वर. आपसूकच उत्तरे , प्रतिसाद येत राहतात व त्यातून अनेक मजेशीर , हसवणारे संवाद घडतात. अनेक समविचारी groups ही असतात. या सोयीमुळे तर अनेक प्रश्न मार्गी लाग्ण्यासही मदत होते. कोणी आजारी आहे , रक्ताची गरज आहे - मदतीसाठी खुपजण पुढे सरसावतात व माणुसकीचा दुवा मजबूत होतो.
मध्यंतरी लोकपाल बिलासंबंधी झालेल्या अनेक मोहिमांना सुद्धा सोशल नेटवर्किंगमुले प्रसिद्धी व जनाधार मिळाला हे सर्वश्रुतच आहे. मनाच्या कक्षा रुंदावून किती प्रकारे एकाच गोष्टीचा विचार होऊ शकतो याचाही साक्षात्कार होतो व आपली क्षितिजे आपोआपच विस्तीर्ण होतात. कोण काय लिहितो, काय ट्विट करतो यावर अनेक प्रतिक्रिया वाचायला मिळतात. उदाहरणार्थ: Cattle क्लास ही नवी संज्ञा प्रथम सोशल नेटवर्क वरच आली, नाही का?
अजून एक गम्मत अशी की संवादातून भरपूर करमणूक होते . आता बहिण भावातील हा संवाद बघा:
भाऊ: दोन दिवसात ती येणार! ताई तू आईला सांगू नको.
ताई: मी सांगणार.
भाऊ: मी तुला ट्रीट देईन.
ताई : कधी? कुठे?
भाऊ: आता आलीस ना लायनीवर ....वडा पाव
ताई : नाही ..मला रस्त्यावरची स्वस्तातली ट्रीट नको....'मिन्ग्स' ला जाऊ
हा संवाद चालू असताना एखादी मावशी मध्येच लिहिते: पण, मला पण तुझ्या आईचा मोबाइल नंबर माहिती आहे.....मी सांगणार
भाऊ: ट्रीट कटाप...... करा काय करायचं ते
मावशी: नाही रे , मी नाही सांगणार ....अशीच गम्मत केली..... तू दे तुझ्या ताईला ट्रीट
ताई: अगं मावशी , तो नुसतं म्हणतो, आयत्या वेळेला मलाच पैसे काढावे लागतात ....म्हणतो कसं - मी wallet घरीच विसरलो. मावशी I tell you, these second born are महा चालू stuff.
असे सुखसंवाद, सुखदुखाची देवाण घेवाण, चांगले पुस्तक, चांगल्या आठवणी,म्हणतात ना - जे जे उत्तम , उद्दात्त , उन्नत, महन्मधुर ते ते...... सर्व share केलं जातं....आपण स्वकीयांपासून कितीही दूर असलो तरी क्षणात जवळ येतो. आणि हे सगळं तुमच्या वेळेत , तुमच्या सोयीनुसार आणि तुमच्या निवडीप्रमाणे - वाटले तर सहभाग घ्यावा , वाटले तर नुसतीच गम्मत अनुभवावी, वाटले तर दुसर्यांचे विचार वाचून आत्मपरीक्षण करावे - Choice is totally yours. अगदी स्वच्छंदी पाखरा सारखेच.
आता या सगळ्याला व्यावहारिक बाजू सुद्धा आहे .नाही असे नाही. आपण जितके जास्तीत जास्त सोशल नेटवर्किंगचा वापर करू तितका प्रवर्तकांना अधिक नफा. जास्त जाहिराती, जास्त स्पर्धा.
बिकट प्रश्न भारी!
परंतु सगळेच शोध हे असेच असतात. वीज निर्मिती, पाणी, दूरदर्शन .....एक हवा सोडली तर काहीही फुकट नसते. अगदी रक्ताची नाती सुद्धा - पण आपुलकी, प्रेम या भावनांनी ओतप्रोत भरून जाणे - याला तुम्ही किंमत ठरवूच शकत नाही - मूल्यमापनाच्या पलीकडचे नाते - दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव.
अनघा हुन्नुरकर
ता. क. : कृपया आपला अभिप्राय जरूर कळवावा, ही विनंती

No comments:
Post a Comment
Value your comments.Helps to hone my skills
thanks
anagha